कडेगावात रंगणार तिरंगी सामना

सह्याद्री दर्पण
कडेगावचं राजकारण दुहेरी परिघात फिरत होतं. सध्याला हा परीघ विस्तारत आहे. पक्षापेक्षा व्यक्तीपूजक राजकारण घिरकी घेत राहिलं आहे. पक्ष नंतर माझा नेता मोठा, हे इथल्या राजकारणाचं वळण. निवडणूक कोणतीही असो, या स्वरूपात बदल होत नाही. कदम आणि देशमुख गटात गाव विभागलं होतं. यात आत्ता लाड गट नव्याने जन्माला आला आहे. यामुळंच कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीने तिहेरी रूप घेतलं आहे. ही निवडणूक अटीतटीची, तितकीच रंजक ठरणार आहे.कडेगावात रंगणार तिरंगी सामना
राजकारणाच्या सारीपाटावर कडेगावच्या राजकारणानं वलय प्राप्त केलं आहे. स्व. पतंगराव कदम साहेब यांचं कडेगाव हे बिरुद चिकटलं होतं. त्यांच्या विकासात्मक मायेनं कडेगावचं रुपडं पालटून गेलं आहे. त्यांची जागा आत्ता पुत्र व कर्तबगार मंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतली आहे. भाजपचे नेतृत्व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख करीत आहेत.
कदम व देशमुख गटाला आत्ता तिसरा पर्याय उभा राहिला आहे. आमदार अरुण अण्णा लाड व शरद लाड या गटाला बळ देत आहेत. काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातील राजकारणाचा अनुभव कडेगावकर घेणार आहेत.