क्राईम न्युज

तडसरच्या युवकावर कुऱ्हाड व गुप्तीने हल्ला

Spread the love

सह्याद्री दर्पण

तडसर (ता. कडेगाव) येथील रोहन राजेंद्र खवळे वय – १८ या युवकावर वांगी येथील हर्षल पोपट शिंदे वय – १८ व प्रथमेश कांबळे वय – १८ यांनी कुऱ्हाड व गुप्तीने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २२ फेब्रुवारी रोजी फकीर मळा वांगी येथे घडली. गुन्ह्याची नोंद चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत माहिती अशी, पूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी करणेस का आला, याचा राग मनात धरून रोहन खवळे याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हर्षल व प्रथमेश यांनी कुऱ्हाड व गुप्तीने वार करून गंभीर जखमी केले. तपास सहा. पो. उपनिरीक्षक एम. एस. शिंदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!