क्राईम न्युज

पत्रकारांवर गुन्हा दाखल करणाऱ्या तहसीलदार गुन्ह्याच्या फेऱ्यात

Spread the love

पत्रकार मारहाण : प्रांताधिकारी व तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पत्रकारांचे ठिय्या आंदोलन

दत्ता पवार
फेरा कुणाला चुकत नाही, असं वयोवृद्ध सांगतात. फेऱ्याचं चक्र फिरतं असतं. याचं बोलकं उदाहरण समोर आलं आहे. फेऱ्याच्या केंद्रस्थानी आल्या आहेत, कडेगावच्या तहसीलदार मॅडम. तहसीलदार मॅडम यांना कोणता बरं फेरा गाठणार? न्यायदानाचं काम करणाऱ्या मॅडम फेऱ्यात कशा काय अडकणार? अशा असंख्य प्रश्नांच्या सरबत्तीनं मनाचं काहूर माजलं असंल. हो, यात तथ्य बी आहे. एवढं मोठं पद आणि गुन्ह्याचा फेरा? असं वाटणं स्वाभाविक आहे. या फेऱ्याचा सामना कडेगावच्या तहसीलदारांना करावा लागणार. या फेऱ्याचं सूत्रधार पद चौथ्या स्तंभानं स्विकारलं आहे. चौथ्या स्तंभानं काम चोख पार केलं. पण जीवावर बेतलं. या बेतण्यामागं तहसीलदार मॅडम असल्याचा पक्का समज चौथ्या स्तंभाचा झालाय. यापूर्वी मॅडमनी पत्रकारांची खोड काढली. पत्रकारांवर गुन्हा दाखल केला. ही सल असतानाच पुन्हा एकदा मॅडम पत्रकारांच्या निशाण्यावर आल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून कैक पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा फेऱ्याचा फास आवळत जाणार आहे. पत्रकारांचं आंदोलन तीव्र होणार आहे.

नीती आणि नीतिमत्ता हातात हात घालून चालतात. पद, प्रतिष्ठा नितीमत्तेपुढं झुकून राहते. जेव्हा नितीमत्तेला तडा दिला जातो, तेव्हा नितीचं चक्र उलटं फिरतं. याचंच वास्तव पुढं आलं आहे. निमित्त ठरलंय वाळू तस्करी. वाळू तस्करीत महसूल विभागाच्या पाठीशी राहणारा पत्रकार बिथरला आहे. त्यांचं बिथरणं रास्त आहे. सूरज जगताप नामक पत्रकाराने वाळू तस्करीची खबर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिली. त्याचा हेतू शुद्ध होता. पण वाळू तस्करांनी त्याला बेदम मारहाण केली.

सूरज जगताप या पत्रकाराने दोन अधिकाऱ्यांना टीप दिली. मग वाळू तस्करांना ही बातमी कशी लागली. खबर दिल्याच्या काही अवधित वाळू तस्करांनी सूरज याला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. यामागं कोण? याचा छडा सुरज जगताप यांना लागला आहे. याचे पुरावे त्याच्याकडे आहेत. यावर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. पत्रकारांनी विटा येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी वाळू तस्करांच्या मारहाणीचे बळी ठरले आहेत. या वेळी पत्रकार महसूल विभागाच्या पाठीशी ठाम उभा राहिलाय. असं असताना उपकाराचं अपकरानं अशी फेड व्हावी?

कडेगावच्या तहसीलदार मॅडम यांनी मागील वर्षी पत्रकारांवर गुन्हा नोंद केला. पत्रकारांची ही यादी मोठी होती. पण एक पत्रकार त्यांच्या गुन्ह्याचा शिकार झाला. पत्रकारांविरोधात भूमिका घेण्यानं त्यांच्यावर त्यावेळी टीकेचा भडिमार झाला. पत्रकार विरोधी, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. यामुळेच दुखावलेले पत्रकार एकवटले आहेत. त्यांना पत्रकार संघटनेची जबरी साथ आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी याविरोधात आवाज उठविण्याचं आश्वासन दिलं आहे. तहसीलदार मॅडम यांच्या मागचा फेरा दाट होत चालला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!