क्राईम न्युज

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : संजय बापू विभूते

Spread the love

सह्याद्री दर्पण
पत्रकार सूरज जगताप यांच्यावर वाळू तस्करांनी केलेला हल्ला आणि त्यांना मदत करणारे अधिकारी दोषी आहेत. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय बापू विभूते यांनी केली. पत्रकार आंदोलन स्थळी भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.

संजय बापू विभूते म्हणाले की, पत्रकार सामाजिक हित जपत असतो. वाळू तस्करांनी त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा आहे. या हल्ल्याला बळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाहीत. पत्रकार संरक्षण कायदा करण्यात उद्धव ठाकरेंची भूमिका महत्त्वाची होती. मी आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!