पत्रकार मारहाण : विविध संघटनांचा कडेगावात रास्तारोको

सह्याद्री दर्पण
पत्रकार सुरज जगताप यांना मारहाण करणाऱ्या वाळू तस्करांवर व वाळू तस्करांना मदत करणाऱ्या महसुल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज येथील बसस्थानक चौकात गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), जनता क्रांती दल,शेतकरी संघटना यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्रकार जगताप यांना
मारहाण करणाऱ्या वाळू तस्करावर व वाळू तस्करांना मदत करणाऱ्या महसुल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज येथे जोरदार घोषणाबाजी करुन बसस्थानक परिसर दणाणून सोडला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए- आंबेडकर) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष, महादेव होवाळ, जनता क्रांती दलाचे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष- आकाश सातपुते, शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष, परशुराम माळी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, जीवन करकटे, रिपब्लिकन पक्षाचे मुस्लीम आघाडी जिल्हाध्यक्ष दस्तगीर फकीर, रिपब्लिकन पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष, प्रवीण काळे, जनता क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष, अजित पाटोळे, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष, विजय माळी, रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष, रुपेश कांबळे. युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष गणेश साठे, जयकर काळे, सागर आयवळे, अजित वायदंडे, सुशांत काळे, लखन मिसाळ, राजेंद्र आयवळे,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.