शिवप्रभू विद्यालयात अश्विनी कोळीचा सत्कार

कडेगाव
राज्य लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षेत माजी विद्यार्थिनी कु अश्विनी कोळी हिची PSI म्हणून निवड झाले बद्दल जय महाराष्ट्र शिक्षण संस्था व शिवप्रभू विद्यालयाच्या वतीने सत्कार घेण्यात आला. तसेच नूतन नगर सेवक व संस्थेचे तरुण संचालक पै अमोल डांगे यांचा सत्कार करण्यात आला .
कै. यशोमती कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ संस्थेचे खजीनदार श्री दिपक कुलकर्णी यांचे कडून स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रु रोख पारितोषिक देण्यात आले .
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाराम डांगे यांनी यश मिळाल्यानंतर मागे वळून पहा व आपल्या आई वडील व गुरुजनांना कधी ही विसरू नका असा बहुमोलाचा संदेश दिला.
खजिनदार श्री. दिपक कुलकर्णी यांनी यश मिळवल्या नंतर सुद्धा समाजासाठी काम करावे असे सांगितले.
प्रदिप कोळी यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून चिकाटीनं प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळू शकते, असे प्रतिपादन केले.
कु अश्विनी कोळी ने कसा अभ्यास केला व यश संपादन केले याबद्दल तीने मार्गदर्शन केले .
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुरेश यादव, सचिव श्री. वसंत इनामदार, श्री. अमोल डांगे , पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.