आरोग्य व शिक्षण

कडेगावची उर्दू शाळा आदर्शवत : नगराध्यक्ष धनंजय देशमुख

Spread the love

उर्दू शाळा कडेगवाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

कडेगाव
कडेगाव शहरातील जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आदर्शवत असल्याचे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते जिल्हा परिषद उर्दू शाळा कडेगाव येथील विद्यार्थी निरोप समारंभावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड सार्वजनिक बांधकाम सभापती नजमाबी पठाण, नगरसेवक सिद्दीक पठाण, इम्तियाज शेख, हाजी. फिरोज बागवान प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, याच उर्दु शाळेने अनेक विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पदावर नेऊन बसवले आहे ही शाळा काही दिवसांपूर्वी बंद पडण्याच्या स्थितीमध्ये होती, हे सर्व कडेगावच्या ग्रामस्थांनी पाहिले आहे पण संग्रामसिंह देशमुख भाऊ यांनी जिल्हाध्यक्ष असताना या शाळेला विशेष मदत देऊन इमारती व अन्य सामग्रीसाठी मोठा निधी दिल्यामुळे आज ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून नावारूपाला आली आहे.
अजूनही या शाळेला काही मदत लागल्यास नगरपंचायती कडून आम्ही करणार असल्याचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी सांगितले.
यावेळी शाळेला निरोप देताना विद्यार्थ्यांनी शाळेला सिलिंग फॅन धनंजय देशमुख भैय्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळा समितीच्या स्वाधीन केला.

यावेळी नगरसेवक विजय शिंदे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख,बबन रास्कर,अक्षय हवालदार, मुख्याध्यापक फारुख मुजावर, प्रकाश नलवडे, आरिफ काजी, सर्व विद्यार्थी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!