वांगीतील क्रिडा संकुलास १० लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
कडेगाव
वांगी (ता. कडेगाव) येथील क्रिडा संकुलास १० लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून क्रीडा संकुलाची दुरूस्ती व खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आमदार अरूण (आण्णा) लाड व राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सांगली जिल्हा सरचिटणीस मोहसीन जमादार यांच्यासह सांगली जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील, जिल्हा संघटक पृथ्वीराज यादव, कडेगाव तालुका अध्यक्ष अथर्व खाडे, कडेगाव शहर अध्यक्ष हरी हेगडे यांनी वांगी येथील क्रीडा संकुलाची दुरूस्ती व खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कडेगाव तहसीलदार व सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देवून वारंवार पाठपुरावा केला होता.
क्रिडा संकुल हे गेले कित्येक दिवसांपासून बंद सरूपात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडूंची गैरसोय होत असून त्याठिकाणी खेळाडूंना सरावासाठी लागणारे साहित्याची उपलब्धता नसल्याने खेळापासून वंचित राहतात. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे गुणवत्ता असूनही खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहतात.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश आले असून क्रिडा संकुलाचे दुरूस्तीसाठी १० लाख ८२ हजार रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. त्यामध्ये खिडक्यांना स्लायडींग व जाळी, स्टिल जाळी, शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या विहिरी पासुन क्रिडा संकुलापर्यंत पाण्याची व्यवस्था, क्रिडांगणावरती लाल माती टाकून ट्रॅक तयार करणे. या कामांना सुरुवात झाली आहे.
वांगी येथील शासकीय क्रिडा संकुल बंद स्वरुपात होते. त्यामुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याच्या अनुशंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी व तहसीलदार यांचाकडे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून निवेदन देवून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी १० लाख ८२ हजार रुपये निधी वर्ग करण्यात आला. त्याचबरोबर येणाऱ्या काळात जास्तीत जास्त खेळाडूंना क्रिडा संकुलाचा फायदा व्हावा व त्यांना हव्या असणाऱ्या सोई सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे.
मोहसिन राजू जमादार
सरचिटणीस-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली जिल्हा