आरोग्य व शिक्षण

पाया भक्कम करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे : गटशिक्षणाधिकारी अनिस नाईकवाडी

Spread the love

कडेगाव
तारूण्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील सोनेरी काळ असतो, पण हाच काळ विद्यार्थ्यांच्या पायाभरणीचा देखील असतो. आपल्या जीवनाची भक्कम इमारत उभी करायची असेल तर या पायाभरणी च्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कडेगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी केले.

मौजे कोतवडे येथे सुरू असणाऱ्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोतवडे गावचे सरपंच संभाजी यादव तर यावेळी कडेगाव पोलिस स्टेशनचे पी. आय. भोपळे, पोलीस कॉन्स्टेबल सौ. प्रियांका वेताळ, पंचायत समितीचे विषयतज्ञ राहुल वीर, माजी सरपंच संजय जाधव उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. सौ. संगीता पाटील व कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र महानवर यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.

विनम्रता हा गुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नम्रता हा गुण वाढीस लागतो असे सांगून गटशिक्षणाधिकारी अनिस नाईकवाडी पुढे म्हणाले की, समाजात काम करताना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नुसताच श्रमसंस्कार होत नसून उत्तम नागरिक बनण्यासाठी सुसंस्कार होत असतात. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झाल्यास जीवनास आवश्यक असणारी मूल्ये प्राप्त होऊन विद्यार्थी हा सुजान नागरिक बनतो, असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी बोलताना कडेगाव पोलिस स्टेशनचे पी.आय भोपळे साहेब म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून श्रमाबरोबरच उत्तम सुसंस्कार रुजवण्याचे काम केले जाते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला सुसंस्कारांची जोड मिळाली पाहिजे, आणि हे संस्कार रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते असे सांगून श्री भोपळे शेवटी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून जीवनास आवश्यक असणारी शिदोरी, मूल्ये मिळत असते. आणि या शिदोरीवरच भावी आयुष्याची उज्वल इमारत उभी राहते म्हणून भावी आयुष्यात उत्तम नागरिक बनण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे आहे. त्यापासून समाजाचा व राष्ट्रचा विकास होतो, असेही ते शेवटी म्हणाले.

प्रारंभी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे, श्री. स्वामी विवेकानंद, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र महानवर यांनी गेल्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक संगीता पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कोथवडे गावचे सरपंच सर्व सदस्य व नागरिकांचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र महानवर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे, यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. सुरज डुरेपाटील यांनी केले. या कार्यक्रमास कोथळे गावचे नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!