आरोग्य व शिक्षण

डॉ. सुनील पवार यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार

Spread the love

सह्याद्री दर्पण

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचा राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) विभागाचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट प्रोग्राम ऑफिसर (आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार) म्हणून डॉ. सुनील गणपतराव पवार यांना महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्याहस्ते शासकीय सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. डॉ. सुषमा सुनील पवार उपस्थित होत्या. डॉ. सुनील गणपतराव पवार हे भारती विद्यापीठातील यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत.

डॉ. अमोल मोहन पाटील यांनी माहीती देताना असे सांगितले की
डॉ. सुनील गणपतराव पवार हे गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांचे वनस्पतीशास्त्र विषयावर व्याख्याने होतात. डॉ. पवार यांचे वनस्पतीशास्त्र विषयावर जागतिक पातळीवर एकुण 27 रिसर्च पेपर व विविध शोध निबंध प्रकाशित केले आहेत. या शासकीय पुरस्कार वितरण सोहळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे सर उपस्थित होते. महाविद्यालयास आदर्श महाविद्यालय म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थी सत्यम जयवंत देवकर यांस आदर्श स्वयंसेवक पुरस्कार,
डॉ. एस. आर. पाटील (भूगोल विभाग) यांना प्रसंशा पत्र देवून गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांसह सर्वानीच सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवकवर्ग व योग्य प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले.
मुबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यांचे उच्च व तत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांनी 6 जून रोजी होत असणारा शिवस्वराज्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करावा असं मत व्यक्त्त केलं. हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव सर, आमदार श्री. मोहनराव कदम दादा व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!