आरोग्य व शिक्षण

भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रबोधिनीतील उमेदवार अनमोल यशवंत कोरे यांची MPSC राज्यसेवेमध्ये राज्यात १८व्या गुणानूक्रमाने निवड

Spread the love

कडेगाव

भारती विद्यापीठाचे अभिजीत कदम प्रबोधिनीतील उमेदवार अनमोल यशवंत कोरे यांची MPSC आयोगामार्फत 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.  अनमोल यशवंत कोरे यांची स्पर्धा परीक्षेद्वारे राज्यसेवेत महाराष्ट्र राज्यात १८व्या गुणानक्रमाने अंतिम निवड झाली आहे. पदे अजून जाहीर झाली नाहीत. श्री कोरे, यांना उपलब्ध पदे, त्यांचे गुण व इतर बाबी पहाता क्लास-वन वर्गातील उच्च पद निश्चित जाहीर होईल व ते उच्च पदस्थ अधिकारी होतील. त्यामुळे कडेगावच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे.

अनमोल कोरे हे कडेगांव , तालुका- कडेगांव या गावचे असून त्याचे शिक्षण Engineering झाले आहे.
यापूर्वीही या प्रबोधिनीतून अनेज उमेदवारांची विविध पदांवर निवड झालेली आहे. प्रबोधिनी मध्ये नियमीत विषयनिहाय मार्गदर्शनपर वर्ग, तज्ञ व अनुभवी शिक्षक, UPSC, MPSC आणि इतर निवड मंडळ याचेमार्फत निवड झालेले व कार्यरत असणारे IAS, IPS , IRS तसेच डेप्युटी क्लेकटर, पोलीस उपअधीक्षक, प्रांत, तहसीलदार , बँक अधिकारी यांची संवादसत्रे, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका, संगणक कक्ष, इंटरनेट, वर्तमानपत्रे, मासिके, समुपदेशन, भव्य क्रीडांगण आणि प्रशिक्षण, सुरक्षित, शैक्षणिक आणि यशदायी कॅम्पस इ. सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या उत्तुंग यशाबद्दल अनमोल कोरे यांचे भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, विद्यापीठाचे कार्यवाह आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार वनश्री श्री.मोहनराव (दादा) कदम, कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे, सागरेश्वर सूटगिरणीचे चेयरमन व युवक नेते श्री. शांताराम (बापू) कदम, युवा नेत्रुत्व डॉ. जितेश (भैय्या) कदम यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!