विहापूर येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

स्व.संपतराव देशमुख यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
परवेज तांबोळी
आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार,डोंगराई उद्योग समूहाचे संस्थापक.स्व.आमदार.संपतराव(अण्णा)देशमुख यांच्या 26 व्या पुण्यतिथी निमित्त आज कडेपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 10:30. वा.प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता विहापुर ता.कडेगाव या ठिकाणी भव्य अशा कुस्ती मैदानाचे आयोजन विहापुर सर्व सेवा सोसायटी विहापुर व रेणुशेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
विहापूर, ता.कडेगांव येथील कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती १ लाख रुपयांची, द्वितीय क्रमांकाची कुस्ती ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाची कुस्ती ५० हजार, चौथ्या क्रमांकाची कुस्ती ३०हजार, पाचव्या क्रमांकाची कुस्ती २५ हजार, सहाव्या क्रमांकाची कुस्ती २० हजार, तर इतर सर्व कुस्त्या शंभर रुपये ते ५ हजार रुपयपर्यंत च्या सर्व कुस्त्या मैदानात जोड पाहून लावल्या जाणार आहेत.
या कुस्ती मैदानसाठी सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय(भैय्या)देशमुख, उपनगराध्यक्ष.विजय गायकवाड,पै.उत्तमराव चव्हाण, हिंदकेसरी.पै.संतोष वेताळ,डबलमहाराष्ट्र केसरी,पै. चंद्रहार पाटील,नगरसेवक.पै.अमोल डांगे,संदीप गायकवाड,पै.विनोद गोरे,मोहन माळी, संदिप रास्कर
पांडुरंग चव्हाण,दादासो पवार,विजय चव्हाण, बापुसो चव्हाण, बाबासो चव्हाण, हनमंत चव्हाण, विक्रम चव्हाण, दिलीप पवार, संग्राम चव्हाण, भास्कर मोरे, धोंडीराम भोंगे,नाथासो रेणुशे,सत्यवान रेणुशे तसेच परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.
–––––––––––––––––––
जाहिरात
आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे जनक,
लोकनेते.स्व.आमदार.संपतरावजी देशमुख अण्णा.
यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन…!
स्व.आ. संपतरावजी देशमुख(अण्णा)