स्पर्धा परीक्षेत कडेगाव पॅटर्न निर्माण करा : डॉ. जितेश कदम

अनमोल कोरे यांचे MPSC द्वारे राज्यसेवेतील नेत्रदीपक यशामुळे कडेगांवच्या शिरपेचात मानाचा तुरा
सह्याद्री दर्पण
कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रबोधिनीतील उमेदवार अनमोल यशवंत कोरे यांची MPSC राज्यसेवेमध्ये राज्यात १८व्या रँकने निवड झाल्यानिमित्त सांगली जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि भारती सहकारी बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम यांच्यहस्ते कोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनमोल याचे आई-वडील आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. जितेश कदम यांनी सांगितले की सद्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप दिवसेंदिवस अत्यंत तीव्र झाले असून दरवर्षी अत्यंत कमी जागांकरीता अंदाजे ३-५ लाख उमेदवार परीक्षा देत आहेत. या पार्श्वभुमीवर आपल्या प्रबोधिनीचे अनमोल कोरे यांनी संपूर्ण राज्यभरातून राज्यसेवेत १८वा रँक मिळवून यश संपादन केले असून त्याचे हे यश कडेगांवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आणि या संपूर्ण परिसराचा नावलौकिक अजून वाढविणारा आहे. त्यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन प्रबोधिनीतील व परिसरातील इतर उमेदवारांनी कष्ट घेऊन स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकाऱ्याची पदे मिळवावीत व देशातील बिहार, तमिळनाडू पॅटर्न प्रमाणेच “कडेगांव पॅटर्न” निर्माण करावा.
याप्रसंगी श्री. अनमोल कोरे, यांनी सांगितले की मला हे यश मिळविण्यामध्ये या प्रबोधिनीचा मोलाचा वाटा आहे. आयोगाचा अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका आणि केलेल्या अभ्यासक्रमाची नियमित उजळणी या त्रिसूत्रीचा मी अवलंब केला.सोबतच जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास या बाबी अंगीकारल्या. या त्रिसूत्रीचा आणि या बाबींचा अवलंब इतर उमेदवारांनी करून यशस्वी व्हावे, असे मनोगत व्यक्त केले.
कडेगांव नगरपंचायतीचे विधमान नगरसेवक दादासाहेब माळी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, की कोरे पती-पत्नी यांनी अत्यंत मेहनतीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. त्यांच्या मुलाने मिळविलेले हे यश इतर युवकांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल. यावेळी पंचक्रोशीतील माळी समाजातर्फे ही अनमोल कोरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख प्रा. नितीन माने यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.
यावेळी कडेगांव नगरीचे नगरसेवक मनोज मिसाळ, सिद्दीकी पठाण, माजी उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी, कला, क्रीडा, समाजकारण क्षेत्रातीळ मान्यवर, ग्रामस्थ, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे इतर विदयार्थी-विधार्थिनी , परीसरातील माळी समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.