तोंडोलीच्या राजकारणातील हुकमी एक्का विजयकुमार मोहिते

दत्ता पवार
हुकमी शब्दावर डोळं झाकून विश्वास ठेवावा, इतका या शब्दाचा वकुब आणि दरारा आहे. राजकारणात हुकमी कार्यकर्त्याला मानाचं स्थान आहे. पण हल्लीच्या राजकारणाचा पोत आणि पत निसरड्या वाटेवरून जात आहे. पक्षीय निष्ठा, नेत्यांवरील प्रेम याला तडा बसतोय. पण याला अपवाद ठरलाय तोंडोली ता. कडेगाव गावचा युवा नेता विजयकुमार मोहिते. नेत्यांवरील निष्ठा आणि गावच्या राजकारणातील हुकमत काय असते याचं विजयकुमार मूर्तिमंत उदाहरण आहेत.
विजयकुमार मोहिते यांच्या कार्याचा आणि नावाचा जयजयकार करणं आज भाग पडलं, त्याचं कारण सर्वसेवा सोसायटीची निवडणूक. निवडणूक आणि राजकारण हातात हात घालून चालतात. या दोन्ही हातांची पकड घट्ट करत विजयकुमार मोहिते यांनी गेली दोन तपं, गावातील राजकारणाची पकड सैल होऊ दिली नाही.
विजय अप्पा हे नामदार डॉ. विश्वजीत कदम यांचे खंदे समर्थक. तोंडोली गावाच्या राजकारणाचा बंदा रुपाया म्हणून अप्पांच्याकडे अख्खा कदम गट पाहतोय. गावातील राजकारण कोणतंही असो, त्यात विजयकुमारांचा विजय निश्चित मानला जातो. त्यांची हातोटी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची कृती, यानं त्यांच्या राजकारणाचा बाज खुलून येतोय. नुकतीच तोंडोली सर्वसेवा सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयकुमार मोहितेंनी एकहाती विजय खेचून आणला. त्यांच्या या यशाचं खुद्द नामदार डॉ. विश्वजीत कदम यांनी कौतुक केलं. तोंडोली सोसायटी चेअरमन म्हणून तुकाराम मोहिते व व्हा. चेअरमन म्हणून नाथा मोहिते यांची निवड झाली आहे. या निवडणुकीने पुन्हा एकदा विजयकुमार मोहितेंचं नाणं वाजलं. म्हणून तर त्यांना हुकमी बिरुदावली चिकटली.