गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचा सत्कार संजय महिंद यांच्याहस्ते करण्यात आला

सह्याद्री दर्पण
शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी श्री. अनिस नायकवडी यांचा सत्कार श्री. संजय महिंद यांच्याहस्ते करण्यात आला. नूतन शिक्षण विस्तार अधिकारी श्री. ज्ञानेश्वर चिमटे यांचा सत्कार कोषाध्यक्ष श्री. जनार्दन ढाणे यांच्याहस्ते करण्यात आला. मावळते विस्तार अधिकारी श्री. विकास राजे यांचा सत्कार श्री. विजय पवार यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्री. अनिस नायकवडी यांच्याकडे शिक्षकांचे प्रश्न आणि अडचणी मांडण्यात आल्या. यावर गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.
शिक्षक संघ नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नावर आग्रही राहिला आहे. शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारा, अशी ओळख शिक्षक संघाच्या कडेगाव तालुक्यातील नेत्यांची आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न शिक्षक संघाच्या नेत्यांनी सोडविले आहेत. यावेळी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री. नानासाहेब कांबळे, श्री. विलासराव शेळके, श्री. अशोकराव महिंद, श्री. धनंजय नरुले, श्री. रघुनाथ जगदाळे, श्री. विजय चोथे, श्री. हणमंत देवकर, श्री. सुरेश धुमाळ, श्री. दीपक महिंद, श्री. चव्हाण गुरुजी, श्री. बबनराव निकम, श्री. रमेश पवार, श्री. धनाजी पाटील, श्री. संजय महिंद, श्री. मुकुंद कारंडे आदी उपस्थित होते.