लोकनेते आमदार श्री. मोहनराव कदम यांच्या वाढदिवस विशेषांकाला भरभरून प्रतिसाद : दिग्गजांनी केलं ‘सह्याद्री दर्पण’च्या वाढदिवस विशेषांकाचे कौतुक

सह्याद्री दर्पण
लोकनेते आमदार मोहनराव कदम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त मासिक “सह्याद्री दर्पण’ च्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन नेटके झाले. दिग्गजांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. 89 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ना. डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, पृथ्वीराज पाटील, महेंद्र अप्पा लाड, बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे, डॉ. जितेश कदम बाळकृष्ण अप्पा यादव उपस्थित होते.
‘सह्याद्री दर्पण’ने वनश्री आमदार मोहनराव कदम दादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे दिग्गजांनी कौतुक केले. ‘सह्याद्री दर्पण’ ने दादांचा संपूर्ण जीवनपट उलगडला असल्याची भावना दिग्गज मान्यवरांनी व्यक्त केल्या.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून आमदार मोहनराव कदम प्रेमी उपस्थितीत होते. कडेपूर (ता. कडेगाव) येथील राजवीर मंगल कार्यालयात प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला. सूत्रसंचालन प्रा. अविनाश यादव यांनी केले.