स्वच्छ पाणी प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार : धनंजय देशमुख

चिखली येथे ६२.३८ लक्ष किमतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचचे धनंजय देशमुख यांच्याा हस्ते भूमीपूजन संपन्न
कडेगाव: परवेझ तांबोळी
प्रत्येक नागरिकाला निरोगी आरोग्य जगण्यासाठी पिण्यासाठी व इतर गरजासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे हैं हा त्या नागरीकाचा अधिकार आहे असे प्रतिपादन कडेगांव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांनी केले.
ते चिखली (ता.कडेगांव) येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी श्रीमती शकुंतला आयवळे, प्रकाश शिंदे, भानुदास शिंदे, जयवंत शिंदे,शशिकला शिंदे,राहुल शिंदे,विजय जाधव प्रमुख उपस्थित होते.
धनंजय देशमुख पुढे म्हणाले की संग्राम भाऊ देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सर्व सामान्य जनता केंद्रबिंदू मानून चौफेर विकास केला.
सर्वसामान्य जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करून जल जीवन मिशन अंतर्गत भरघोस निधी खेचून आणला. आज चिखली सारख्या छोट्याशा गावात 63 लाखाचा भरघोस निधी जल जीवन मिशन अंतर्गत घेऊन नागरिकांचा पाण्यांचा मोठा प्रश्न भाऊंनी कायमचा निकालात काढला. हे काम लवकरच पूर्ण होऊन चिखली ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी पंढरीनाथ शिंदे ,भीमराव शिंदे,हिंदुराव शिंदे,अशोक जाधव,शंकर जाधव,निलेश शिंदे,तुकाराम शिंदे,गणपती शिंदे, अंकुश मोहिते,बबन शिंदे, सुनील जाधव ,राजकुमार जाधव यांच्या सह चिखली ग्रामस्थ उपस्थित होते.