ताज्या घडामोडी

शिक्षक संघाचा स्वाभिमानी हुंकार : शिक्षक बँक निवडणुकीत विजयाचा निर्धार

Spread the love

सह्याद्री दर्पण
शिक्षक बँकेची निवडणूक लागली आणि शिक्षक संघटनांनी प्रचाराचा धडाका लावला. शिक्षकांची जीवनवाहिनी म्हणून शिक्षक बँकेकडे पाहिले जाते. निवडणूक लागली आणि स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघाने ‘अभी नहीं तो कभी नहीं’ नारा दिला. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ कडेपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या डोंगराई देवीच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी विजयी ‘हुंकार’ देण्यात आला.

कडेगावात शिक्षक बँक निवडणुकीचा झंझावती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शिक्षक प्राथमिक शिक्षक मंडळ तालुका कडेगाव प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व प्रचार शुभारंभ शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शिक्षक प्राथमिक शिक्षक मंडळ, तालुका कडेगाव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कडेगाव येथे सौ नंदाताई नानासो कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. आणि कडेगाव सर्वसाधारण गट उमेदवार श्री. संजय महिंद (आप्पा) यांचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम श्री डोंगराई मंदिर कडेपूर याठिकाणी संपन्न झाला .

यावेळी  शिक्षक संघ राज्य कार्याध्यक्ष श्री. पोपटराव सूर्यवंशी, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री. हंबीरराव पवार ,शिक्षक संघ जिल्हा सरचिटणीस श्री. अविनाश गुरव ,शिक्षक नेते – श्री जगन्नाथ कोळपे , श्री विश्वास पुजारी ,श्री. नानासाहेब कांबळे श्री.अशोकराव महिंद, श्री विलासराव शेळके , शि. द.पाटील गटाचे नेते श्री. मधुकर जंगम ,श्री भिमराव पवार तसेच संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री. समाधान ऐवळे सर ,श्री प्रदीप पवार, श्री महेश कुंभार ,जुनी पेंशन संघटना नेते श्री राहुल कोळी सर , मोहिते सर,
खानापूरचे उमेदवार श्री. धनाजी घाडगे, श्री. संतोष जगताप. तासगावचे उमेदवार -श्री शब्बीर तांबोळी, श्रीकांत पवार , दिलीप शिंदे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सौ. शोभा शिंदे जिल्हा महिला नेत्या सौ.नंदाताई कांबळे कडेगाव महिला अध्यक्षा सौ. आशा पाटील, सौ.घाडगे मॅडम , सौ.मंदाकिनी महिंद ,सौ सुजाता पाटील ,सौ. मंजुश्री रेणूकर याबरोबरच कडेगाव तालुक्यातील शिक्षक बांधव आणि भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धनंजय नरुले सर पार्लमेंट बोर्ड सदस्य यांनी केले आणि आभार नेते श्री नानासो कांबळे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!