स्पर्धा परीक्षांची आत्तापासूनच तयारी करावी : पृथ्वीराज देशमुख.

बारावीच्या विद्यार्थ्यांचा पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते सत्कार
कडेगांव : परवेझ तांबोळी.
कडेगाव पलूस तालुक्यातील बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले त्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेची आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे म्हणजे येणाऱ्या काही दिवसात चांगल्या प्रकारे यश मिळून प्रशासकीय सेवा करण्याची संधी युवक-युवतींना मिळेल असे प्रतिपादन भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
ते कडेपूर या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयामध्ये कडेगाव पलूस तालुक्यातील बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेगाव पलूस तालुक्यातील बारावीच्या परीक्षेत हे यश संपादन करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.