राष्ट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुक्यात बळकट होतेय !

दत्ता पवार
बळकट, ताकदवान, शक्तिशाली शब्दांचा वापर होत असताना, स्फुर्ती येते. अशाच स्फुर्तीचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत. यात नवल कसलं, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीचं नवल मान्यच करावं लागतं. शून्यातून सुरवात करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढायला लागली आहे. कडेगाव तालुक्यात मागील दोन वर्षात राष्ट्रवादीने हातपाय पसरायला सुरुवात केली. आजमितीला राष्ट्रवादीला सोडून राजकारण होणं अवघड बनलंय. आमदार अरुण अण्णा लाड आणि युवा नेते शरद लाड यांच्या संयमित पण आक्रमक पवित्र्याने हा बदल होतोय.
कडेगाव तालुका पूर्वाश्रमीचा काँग्रेस विचारधारेचा. आजही काँग्रेसचे प्राबल्य आहे. पण संपुर्ण काँग्रेस विचारधारेत फूट पडली. 2014 पासून भाजपच्या रूपाने उजवा विचार रुजतोय. काँग्रेस आणि भाजप अशी सरळसोट विभागणी होती. पण आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला गिणतीत धरावे लागत आहे. अरुण अण्णा लाड आमदार झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे चांगलीच रुजू लागली आहेत. कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी वाढीसाठी मंत्री जयंतराव पाटील आग्रही आहेत. आमदार अण्णा आणि शरद भाऊ यांची मेहनत कामाला येत आहे. दिवसागणिक राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची बातमी धडकत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाचा ओघ वाढला आहे.
कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी, वडियेरायबाग, खेराडेवांगी या गावात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. आमदार अरूण (अण्णा) लाड व सांगली जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली,
ढाणेवाडी येथील हिंदुराव जानकर, हणमंत गोरड, वासुदेव गोरड, जयराम गोरड, काकासो शेंडगे, महादेव बरकडे. वडियेरायबाग येथील माजी उपसरपंच प्रशांत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गायकवाड, सुनील सुर्यवंशी, चंद्रकांत पवार, सुनील मोहिते. खेराडे वांगी येथील बापुराव सुर्यवंशी, दत्तात्रय पवार यांनी जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, कडेगाव पंचायत समिती माजी सभापती महेंद्र करांडे, सोमनाथ घार्गे, दादासो पोकळे, विनोद जाधव, भानुदास पोकळे, नितीन गुजर, हेमंत मोरे, चंद्रशेखर देशमुख, मोहन मोरे, दिपक ननवरे, संजय येवले, रज्जाक मुलाणी, मिथुन जानकर, किरण जानकर, नामदेव पोकळे, गजानन जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.