शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी पुढं यावं : शरद लाड

जाहिरात
सह्याद्री दर्पण
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवित असून खरेदी विक्री संघाची स्थापना येडे फाटा येथे सुरू करणार आहे. कडेगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रात असणाऱ्या गावांसह ४१ गेटकीन गावांना ऊसविकास योजनेत समाविष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे गट नेते शरद भाऊ लाड यांनी केले. कडेगांव येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावतीने ऊस विकास परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयदीप यादव, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा सरचिटणीस जगदीश महाडीक, कडेगाव पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र करांडे,
कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव शहर अध्यक्ष वैभव देसाई, प्रवीण करडे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, अॅग्रीओव्हरसीयर जयकर मुळीक हे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना शरद भाऊ लाड म्हणाले की, कडेगाव तालुक्यातील जवळपास ४१ गावातील शेतकऱ्यांना कारखाना गेटकिन क्षेत्र असल्यामुळे या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. परंतु इथून पुढे कडेगाव तालुक्यातील जवळपास सर्व गावांना कारखान्याच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यामुळे कडेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी चालना मिळणार आहे.
यावेळी ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कसे उत्पादन निघेल तसेच ऊस पिकासाठी जमीन मशागत, लागण, खत, पाणी व्यवस्थापन विषयी माहिती दिली.
यावेळी अतुल नांगरे, विनोद जाधव, संभाजी पाटील, सोमनाथ घार्गे, सुरेश पाटील, नितीन गुजर, सिकंदर मुल्ला, अमोल पाटिल, हरी हेगडे, संभाजी बाबर, धनंजय कुंभार, अमोल पाटील, गणेश घाडगे, हेमंत मोरे, मोहन मोरे, अजित मुलाणी, बापुराव सुर्यवंशी, किरण कुराडे, वैभव मोहिते, समीर मुलाणी, सागर लाटोरे, जगदीश देशमुख, दादासो पोकळे, अथर्व खाडे, प्रशांत पवार, रमेश कदम, संजय येवले, धिरज सुर्यवंशी, दत्तात्रय महाडिक, बाळासाहेब साळुंखे, यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार संभाजी पाटील यांनी मानले.