ताज्या घडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा खंजीर !

Spread the love

 

दत्ता पवार
खंजीर शस्त्राने राजकारणात खूपच लोकप्रियता मिळवली. खंजीर शस्त्र घातक म्हणून पूर्वीच्या काळातील योद्धे वापरत. या शस्त्राला 80 च्या दशकात मोठी प्रसिद्धी मिळाली. याच्या केंद्रस्थानी शरद पवार होते. तेव्हापासून खंजीरास्त्राचा वापर राजकारणात अधूनमधून केला जातो. पक्षात बंडाळी झाली, की खंजीर शब्द आपसूकच बाहेर येतो. आता याच खंजीराची चर्चा पुढील अनेक दशके होईल. खंजीराच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे असतील.

स्व. वसंतदादा पाटील यांच्या सरकारचा पाठींबा शरद पवारांनी काढला. तेव्हापासून राजकारण्यांच्या तोंडी खंजीर परवलीचा बनला. अनेक पक्षात बंडाळी होत राहते. यावेळी खंजीर पाठीत खुपसला याचा रतीब सुरू होतो. सध्याच्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेत अभूतपूर्व उलथापालथ होत आहे. यामागे एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी होईलही. पण आगामी काळात त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप होत राहणार.

राजकारणातील खंजीराचा वापर ज्यांच्यामुळे होऊ लागला, ते शरद पवार महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. योगायोग म्हणा अथवा नीतीचा खेळ. महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत 80 च्या दशकातील आठवणी ताज्या होत आहेत. यापुढं महाराष्ट्राच्या राजकारणातील खंजीराचा नवा अंक पाहायला मिळणार आहे, हे नक्की !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!