न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी अग्रेसर : ज्ञानेश्वर चिमटे

वांगी
शिक्षणक्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांसह मुलभूत शिक्षणातही वांगी (ता.कडेगांव) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थीनी अग्रेसर असल्यानेच हे हायस्कूल गुणवत्तेत तालुक्यात आघाडीवर असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तारअधिकारी ज्ञानेश्वर चिमटे यांनी व्यक्त केले.
वांगी हायस्कूलच्या दहावीमधील प्रथम पाच विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी मुख्याध्यापक सी.व्ही.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.त्यामध्ये शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून ९० टक्केच्या वर गुण असणारे २३ विद्यार्थी-विद्यार्थीनी आहेत. एन.एम.एम.एस.या परीक्षेतून १७ विद्यार्थ्यांना राष्ट्रिय शिष्यवृत्ती मिळत आहे.असे त्यांनी नमूद केले. यानंतर सरपंच डॉ.विजय होनमाने यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी उपसरपंच बाबासो सुर्यवंशी,सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी,शाळा समितीचे अध्यक्ष सुर्योदय सुर्यवंशी, उपाध्यक्ष रमेश एडके,सदस्या डॉ.वर्षा मोहिते,सौ सुवर्णा कुंभार,सौ भारती फडतरे, रवींद्र मोहिते उपस्थित होते.सहशिक्षक रमेश कोष्टी यांनी सुत्रसंचालन केले व एस.डी.वाडेकर यांनी आभार मानले.