ताज्या घडामोडी

संजय महिंद यांच्या पाठींब्याचा ओघ वाढतोय

Spread the love

 

दत्ता पवार
पाठींब्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाने झोप उडविली आहे. रण कोणतंही असो त्याला पाठींब्याची जोड हवीच. युद्ध असो वा राजकारण पाठींबा असेल तरच विजयश्री मिळते. त्यात वाढता पाठींबा असेल तर विजयाचा रंग न्याराच असतो. अशाच वाढत्या पाठींब्याचा अनुभव श्री. संजय महिंद घेत आहेत. श्री. संजय महिंद कोण, त्यांना मिळणारा पाठींबा कशाबद्दल, याची मांडणी पुढे करूया…

श्री. संजय महिंद हे प्राथमिक शिक्षक. विद्यार्थ्यांना घडविणे त्यांचा पेशा. पण शिक्षकांच्या हक्कासाठी त्यांनी निवडणूक लढविण्याचं ठरवलं. त्यांचा स्वभाव आणि शिक्षकांप्रती असणारा जिव्हाळा, शिक्षक बँकेच्या निवडणुकीत त्यांना कमालीचा फलदायी ठरत आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक लागली आहे.

श्री. संजय महिंद स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे उमेदवार आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि न्यायिक भूमिका यामुळं त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी जाहीर होताच शिक्षक सभासदांनी त्यांचं स्वागत केलं. सभासद केवळ स्वागतावरच थांबले नाहीत तर त्यांच्या भरघोस मतांच्या विजयाचे वचन देत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी दिग्गज शिक्षक नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांना मिळणारा पाठींबा त्यांना विजयी करणारच, असं भाकीत स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सदस्य व्यक्त करत आहेत.

शिवप्रभू विद्यालयाचा संपूर्ण पाठींबा

कडेगाव तालुक्यात स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे उमेदवार श्री संजय ज्ञानू महिंद
(आप्पा ) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने श्री. शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव या ठिकाणी झंजावती दौरा झाला.
यावेळी श्री. शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगावच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा पवार व त्यांचा सर्व स्टाफ यांनी जाहीरपणे स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळास पाठिंबा व्यक्त केला. परिवर्तन ही काळाची गरज आहे. खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना पूर्णपणे तुमच्या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या बाजूने आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!