ताज्या घडामोडी

गद्दारांना क्षमा नाही; निष्ठावंत शिवसैनिकाचा एल्गार

Spread the love

 

सह्याद्री दर्पण
महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाचा कानाकोपरा व्यापून गेला आहे. शिवसैनिक आमने-सामने आले आहेत. शिवसेनेत न भूतो न भविष्यति बंडाळी माजली आहे. या बंडाळीने सच्चा शिवसैनिक पेटून उठला आहे. अशाच कडवट शिवसैनिकाने कडेगावात लक्ष वेधून घेतले आहे. सुनिल मोहिते उर्फ कॅप्टन या शिवसैनिकाने कडेगावच्या मुख्य चौकात भला मोठा बॅनर लावला आहे. ‘गद्दारांना क्षमा नाही’, हा मजकूर लक्षवेधी ठरत आहे.

सुनिल मोहिते लहानपणापासून शिवसेनेचा भक्त. कडेगाव तालुक्यात शिवसेनेची नगण्य ताकद. पण सुनिल मोहिते आणि त्याचे सहकारी सेनेचा आक्रमक किल्ला लढवत आहेत. शिवसेनेचे कार्य कोणतेही असो, त्यात कॅप्टन आघाडीवर असतो. राज्याच्या राजकारणात शिवसेनेवर बाका प्रसंग उद्भवला आहे. महाराष्ट्रभर शिवसैनिक भलतेच आक्रमक झाले आहेत. मग लढवय्या सुनिल मागे कसा राहील ? त्याने स्वखर्चाने कडेगावच्या प्रमुख चौकात बंडखोर आमदारांविरोधात मोठा बॅनर लावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!