ताज्या घडामोडी

सारिका ऍग्रो फूड्स कंपनीची वृक्ष संवर्धनाची ओढ

Spread the love

 

सह्याद्री दर्पण
वृक्ष संवर्धनाचे महत्त्व थोर संत महात्म्यांनी पटवून दिले. जागतिक पर्यावरणात झालेले बदल आणि त्याचा निसर्गावर झालेला परिणाम दिसून येतोय. यावर मात करण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. याचाच भाग होत कडेगाव येथील सारिका ऍग्रो फूड्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या एम. डी. सारिका दत्तात्रय माळी यांच्याहस्ते नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.

कडेगाव येथे सारिका ऍग्रो फूड्स कंपनीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामजिक बांधिलकी हा ध्यास मानून कंपनीचे कार्य सुरू आहे. कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दत्तात्रय माळी यांचा सामाजिक दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. कडेगाव त्यांचं गाव आहे. कडेगाव व परिसरातील लोकांना विविध माध्यमातून मदत केली जात आहे. व्यावसायिक दालन उपलब्ध करून दिले आहे. सारिका फूड्स आणि श्री. दत्तात्रय माळी यांचं कार्य वेगाने पुढं जात आहे.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज म्हणून सारिका ऍग्रो फूड्स कंपनी व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कंपनीच्या एम. डी. सौ. सारिका दत्तात्रय माळी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कंपनीचा स्टाफ उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!