ताज्या घडामोडी

बंडखोर आमदार खानापूर-आटपाडीचे; निषेध पलूस-कडेगाव मतदारसंघात

Spread the love

 

सह्याद्री दर्पण
महाविकास आघाडी सरकारच्या नाकात दम आणणाऱ्या बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. सामान्य शिवसैनिक आक्रमक झाला आहे. बंडखोर आमदारांवर मोठा रोष व्यक्त केला जात आहे. ही धग पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात आली आहे. या मतदारसंघातील शिवसैनिक बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात भलतेच आक्रमक झाले आहे.

खानापूर-आटपाडी आमदार अनिल बाबर यांचा मतदारसंघ. आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारातील पहिल्या फळीतील आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुद्द्यावर बंडखोर आमदारांनी बंड केले आहे. पण आमदार अनिल बाबर काँग्रेस विचारधारेतून पुढे आलेले नेतृत्व. अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास. हाच मुद्दा उपस्थित करून कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची शक्ती अगदीच नगण्य आहे. या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शक्तिमान आहेत. असे असले तरी या मतदारसंघातील शिवसैनिक कट्टर आहेत. पक्षावर बालंट आले की, मूठभर शिवसैनिक रस्त्यावर येतात. बंडखोर आमदार अनिल बाबर यांचा खानापूर-आटपाडी मतदारसंघ. पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या शिवधडीचा. यामुळे या मतदारसंघातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!