ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची इज्जत वेशीवर टांगणारे आदेश मागे घ्यावेत : ऍड. सतिश लोखंडे

Spread the love

सह्याद्री दर्पण

जून महिना संपताच बँक, सोसायटी यांचा कर्जवसूलीबाबत जाचक अटी घालून शेतकऱ्या ची इज्जत वेशीवर टांगणारे आदेश सहकार आयुक्त पुणे यांनी त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा किसान सभा महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल, असा इशारा सांगली जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष ऍड. सतीश लोखंडे यांनी दिला आहे.

परिपत्रकात शेवटच्या परिच्छेदमध्ये थकित कर्जदार संदर्भात त्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी, वर्तमान पत्र, बाजार कमेठी कार्यालय, येथे प्रसिद्ध करावेत, तसेच दवंडी द्यावी . इत्यादी जाचक वसूल माध्यमातून कर्जदाराचे मनावर विपरीत परिणाम होवून त्यास आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावू शकते. कुटुंबीयांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यास पतहिन दर्जात ढकलले जाते. तरी सदरचा मजकूर आदेश त्वरित मागे घ्यावेत. याचा जाहीर निषेध सांगली जिल्हा किसान सभा करित आहे. सदरचा आदेश त्वरित मागे न घेतलेस महाराष्ट्र राज्यात किसान सभा तिव्र अंदोलन करावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!