ताज्या घडामोडी

कडेगावात तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद

Spread the love

 

 

सह्याद्री दर्पण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त कडेगावात तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा, अभियान राबविण्यात येत आहे. देशप्रेमी अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आव्हान सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले. कडेगाव येथील हर घर तिरंगा जनजागृती तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते.

यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, दत्तूशेठ सुर्यवंशी, विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख, बाबसो शिंदे, मुख्याधिकारी कापिल जगताप उपस्थित होते.

रॅलीमध्ये संग्राम देशमुख यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन हर घर तिरंगा, वंदे मातरम, भारत माता की जय, घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, कडेगाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!