ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री; माजी मंत्र्यांच्या भेटीमागं दडलंय काय…!

Spread the love

दत्ता पवार

उधाण’ शब्दानं फेर उभ्या महाराष्ट्रात धरला आहे. यामागं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ पुरुष आहेत. ते कुठंही जावोत, त्यांच्यामागं उधाण वावटळासारखं लागलं आहे. संबंध राज्यभर ते न थकता, न रुकता भ्रमंती करत आहेत. अशाच भ्रमंतीनं त्यांचं आगमन काल सांगलीत झालं. या भ्रमंतीत त्यांची पावलं काँग्रेसच्या तडफदार नेत्याकडं वळली. त्यांच्या या वळण्यातील वळशाने भुवया उंचावल्या. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या भेटीचं निमंत्रण स्विकारलं आणि भेटीच्या चर्चेचा स्फोट झाला. या भेटीमागं दडलंय काय ? या चर्चेनं मोठंच उधाण आलं.

महाराष्ट्र सत्तांतराच्या नाट्यातून अजून सावरला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर या ना त्या कारणाने भरगच्च दौरे सुरू आहेत. काल त्यांची आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट होती. कोल्हापूर येथून त्यांनी प्रस्थान केले. सांगलीत दाखल होताच त्यांचा ताफा भारती परिवाराच्या संस्थेकडे वळला. त्यांच्या ताफ्याचं हे अनपेक्षित वळण होतं. या वळणामागं माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचं निमंत्रण होतं.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अतूट स्नेह होता. या स्नेहाचा बंध पुढं नेण्याचं काम आमदार डॉ. विश्वजीत कदम करीत आहेत. या स्नेहबंधाचा मान राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलदार वृत्तीनं डॉ. विश्वजीत कदम यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांचा उचित सन्मान डॉ. विश्वजीत कदम यांनी केला.

      बंद दाराआड खलबतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यात बंद दाराआड गुपित खलबतं झाली. ही खलबतं काय होती, याचा उलगडा झाला नाही. पण या बंद दाराआडच्या चर्चेला पाय फुटले आहेत. एकनाथ शिंदे आणि विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडी सरकारात एकत्र काम केले आहे. राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा झडत आहेत. त्यात या नेत्यांच्या भेटीनं, चर्चेची दारं सताड उघडली आहेत, हे मात्र नक्की…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!