ताज्या घडामोडी

लाचखोरीनं कडेगाव तहसील पुन्हा चर्चेत; म्होरक्यापर्यंत कारवाईची व्याप्ती जाणार ?

Spread the love

दत्ता पवार
दुष्काळी भागातील लोकांची सोय व्हावी, या उदात्त हेतूनं स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली. तालुक्याला आवश्यक असणारी कार्यालये अस्तित्वात आणली. लोकांची सोय झाली. पण सरकारी बाबूंचा तडाकाही सहन करावा लागत आहे. शासकीय कार्यालयांत मुख्य असणारे तहसील कार्यालय वादाच्या आणि भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी राहिलं. प्रति वर्षी न चुकता लाचखोरी पकडली जात आहे. लाचखोरीनं अंतिम टोक गाठणाऱ्या कडेगाव तहसील कार्यालयात काल अव्वल कारकून लाच घेताना रंगेहात पकडला गेला.

शासकीय कार्यालये आणि लाचखोरी नवी नाही. पण कडेगाव तहसील कार्यालय यात वरच्या स्थानावर राहिलं आहे. छोटेखानी कडेगाव तालुका तहसील कार्यालयाच्या लाचखोरीनं पुरा बदनाम झाला आहे. लाच घेताना पकडण्याची मालिका कायम आहे. तालुक्याची कामगिरी उंचविण्याची जबाबदारी असणाऱ्या या कार्यालयाने तालुका बदनामीच्या गर्तेत ढकलला आहे. ‘दाम करी काम’ या न्यायाने या कार्यालयाचा कारभार सुरू आहे.

दुष्काळी भागातील लोकांची गरज म्हणून अस्तित्वात आलेल्या कडेगाव तहसील कार्यालयाने लोकांना वेठीस धरले आहे. लाचखोरीची मालिका थांबायची नाव घेईना. गलेलठ्ठ पगार असताना सामान्य लोकांना नाडण्याचा उद्योग राजरोस सुरू आहे. काल या कार्यालयातील अव्वल कारकून सुनील चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याने शेतकऱ्याला लाचेची मागणी केली होती. निर्ढावलेला चव्हाण हा दुसऱ्यांदा लाचखोरीत सापडला आहे. सुनील चव्हाण लाच घेताना सापडला. पण या कारवाईची व्याप्ती म्होरक्यापर्यंत जाणार का? हा सवाल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!