ताज्या घडामोडी

सत्तेत नसतानाही आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा विकास रतीब सुरूच

Spread the love

दत्ता पवार

रतीब आणि सातत्य याचं अतूट नातं. जीवनप्रवाह असो वा सामाजिक काम, इथं सातत्य असावचं लागतं. यशात सातत्याला कैक अर्थानं महत्व असतं. हेच मोल ओळखून यशाची शिखरे पादाक्रांत करणारे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची भरारी कमी होताना दिसत नाही. व्यक्तिगत स्तरावर यश मिळवणं याहीपेक्षा सामाजिक स्तरावर यश मिळवणं शाब्बासकीस पात्र ठरतं. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेब कुठंच कमी पडताना दिसत नाहीत. त्यांचा विकासकामांचा रतीब सुरूच आहे.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा त्यांना लाभला आहे. साहेब विकासाचे महामेरू होते. त्यांचं कर्तृत्व सातासमुद्रापार जाऊन पोहचलं. साहेबांची शिकवण आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यात भिनली आहे. म्हणून तर त्यांनी पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला आहे.

महाविकास आघाडी सरकारात ते राज्यमंत्री होते. अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात त्यांनी 800 कोटींचा विकासनिधी मतदारसंघात आणला. चौफेर विकास दृष्टी असणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व. विकासाचा भुकेला म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता मतदारसंघाचं कसं ? असा प्रश्न लोकांना पडला होता. पण चौकटीपलीकडे नातं जपणाऱ्या आमदार साहेबांना अडचण ती कसली. सत्ताबदल झाला तरी त्यांच्या विकासाचा वेग कायम आहे. कडेगाव तालुक्यात त्यांनी 10 कोटींच्या विकासकामांचा धडाक्यात शुभारंभ केला. त्यांची विकासाची भूक शमताना दिसत नाही, हे मात्र खरं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!