ताज्या घडामोडी

लाच प्रकरणात कडेगाव तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा

Spread the love

सह्याद्री दर्पण
कडेगाव तहसील कार्यालयात अव्वल कारकून सुनील चव्हाण हा लाच घेताना रंगेहात सापडला. या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपी म्हणून कडेगाव तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आर. पी. आय. ( A ) ने पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दोन दिवसांपूर्वी कडेगाव तहसील कार्यालयात अव्वल कारकून सुनील दादासो चव्हाण याला लाच स्विकारताना आपणाकडून रंगेहात कारवाई झाली आहे. ही कारवाई तहसील कार्यालयात झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये अशाच पद्धतीची कारवाई आपल्या विभागाकडून झाली आहे. ही कारवाई कंत्राटी कर्मचाऱ्यावर झाली होती. दोन्ही कारवाया तहसील कार्यालयात झाल्या आहेत. कारवाई दरम्यान कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील या त्यांच्या कार्यालयात हजर होत्या.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई होणे म्हणजेच या प्रकरणात त्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून पूर्णपणे जबाबदार त्या आहेत. त्यांच्या सांगण्यावरून असे प्रकार घडत आहेत, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे वरील आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या दोन्ही प्रकरणावरून कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांचेवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडण्यावर निर्बंध येतील.

कडेगाव तहसीलदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए – आंबेडकर ) सांगली जिल्ह्याच्या वतीने वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, कडेगाव तालुकाध्यक्ष प्रवीण काळे, कडेगाव तालुका युवा अध्यक्ष रुपेश कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

माझा संबंध नाही : शैलजा पाटील

अव्वल कारकून सुनील चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सुनील चव्हाण प्रकरणात माझा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी ‘सह्याद्री दर्पण’ला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!