ताज्या घडामोडी

सख्खे शालेय मित्र बनले पक्के वैरी…!

Spread the love

 

दत्ता पवार

वैरभाव ठेवू नये, ही शिकवण वडीलधाऱ्यांकडून दिली जाते. मैत्री नात्यांचं अतूट बंध निर्माण करते. जीवापाड मैत्रीच्या सुरस कथा कानावर पडतात. मैत्रीत मैत्री शालेय मैत्री. या मैत्रीला तर तोडच नाही. सर्वश्रेष्ठ मैत्री म्हणून शालेय मैत्री अग्रस्थान टिकवून आहे. पण याच मैत्रीत ‘दरार‘ आली तर काय होतं, याचं जीतं-जागतं उदाहरण कडेगावात पाहायला मिळत आहे. या मैत्रीचा धागा तोडण्याचं काम राजकारणानं केलं. धनंजय देशमुख आणि विजय शिंदेंच्या पक्क्या मैत्रीआड राजकारणाचा ‘दोर‘ आला. त्यांच्यातील कटुता विकोपाला गेली. यामागं कडेगाव नगरपंचायतीमधील भ्रष्टाचार मुद्दा पुढं आला.

कडेगाव आणि राजकारण वेगळं करून चालत नाही. कडेगावातील राजकारणाचं जाज्वल्य उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कडेगावच्या राजकारणात काँग्रेस नेहमीच भाव खाऊन गेली आहे. पण काँग्रेसच्या भाऊगिरीला भाजपाने व्यसन घातली. नगरपंचायत ताब्यात घेऊन भाजपने नवा अध्याय मांडला. इथंच धनंजय देशमुख आणि विजय शिंदेंच्यात सवतासुभा निर्माण झाला. समवयस्क आणि शालेय मित्रांत दुरावा निर्माण झाला. विजय शिंदे आता काँग्रेसचे पाईक असले तरी ते एकेकाळी देशमुख गटात होते. देशमुख गटाशी फारकत घेत त्यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे नेतृत्व स्विकारले. आता ते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे खंदे समर्थक आहेत.

धनंजय देशमुख आणि विजय शिंदे यांच्यात वीस वर्षापूर्वी राजकीय दुरावा निर्माण झाला. पण टोकाची कटुता नव्हती. आता ती आली. दोघेही गावात वजन राखून आहेत. नगरपंचायत निवडणुकीत दोघेही मोठ्या मतांनी विजयी झाले. धनंजय देशमुख नगराध्यक्ष झाले तर विजय शिंदे विरोधीपक्षनेते. असं असलं तरी या दोघांत चांगलं जमंल, असंच वाटंत होतं. पण कुठंल, त्यांचं तर बरंच फाटलं. या फटण्यामागं नगरपंचायतीमधील भ्रष्टाचार कारण ठरलं. विजय शिंदे भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर नगराध्यक्ष धनंजय देशमुख आरोप खोडून काढून उलट आरोप करतात. यावर विजय शिंदे पुरावेच घेऊन माध्यमांसमोर येतात. एकेकाळच्या दोघां सख्यातील जुगलबंदी रंजक वळणावर आली आहे. यातून पुढं काय निष्पन्न होणार याची उत्सुकता आहे. दोघां मित्रातील राजकीय कलागतीचा फायदा कडेगावकरांना झाला तर चांगलंच आहे. पण ‘पब्लिक सब जानती हैं’ असं म्हणून तूर्तास थांबुया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!