वन्यप्राण्यांना खाऊ घालून पृथ्वीराज देशमुखांनी पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा केला

सह्याद्री दर्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनादिवशी आठ चित्त्यांचे भारतात आगमन झाले. आशिया खंडातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्यात सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सागरेश्वर अभयारण्यातील वानरांना खाऊ देऊन पंतप्रधानांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी इतर खर्च टाळत वन्यप्राण्यांना केळी, बिस्कीट व इतर खाऊ घातले. यापूर्वीही देशमुख यांनी असे उपक्रम राबवून वन्य प्राण्यांविषयी असणारी माया दाखवून दिली आहे. वन्यप्राण्यांना माया लावण्याचा हा उपक्रम ज्ञानदेवांच्या पसायदानाशी नाते सांगणारा आहे, जे धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली रोजच मीष्ठअन्न खातात त्या पोट भरलेल्या समाजाला खाऊ घालण्यापेक्षा मुक्या प्राण्यांना घास भरविण्याचा गाडगेबाबांचा विचार माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. त्यांच्या या वेगवेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.