ताज्या घडामोडी

लम्पीच्या मैदानात आमदार डॉ. विश्वजीत कदम : कृषिमंत्री काकांना साकडं

Spread the love

दत्ता पवार

मैदान कोणतंही असो, तिथं विजेता सरस ठरतोच. या मैदानात सचोटी तर लागतेच, पण कसोटीही लागते. सार्वजनिक युद्धात मोठं परिश्रम घ्यावं लागतं. निधड्या छातीनं सामोरं जावं लागतं. नैसर्गिक आपत्तीत जीव झोकून उतरावं लागतं. हे म्हणणं फार सोपं. पण प्रत्यक्षात कृती कठीण. कठीण काळात सर्वस्व पणाला लावून आपत्तीच्या मैदानात उतरणारा आमदार महाराष्ट्रभर चमकत आहे. त्यांच्या धडपडीची दखल विदेशातही घेतली आहे. आपत्ती कोणतीही असो, हा तडफदार युवा नेता मैदान मारून जातो. ही अतिशयोक्ती वाटेल, पण ही खरीखुरी वस्तुस्थिती आहे. तळपत्या युवा नेत्याचं नाव आमदार डॉ. विश्वजीत कदम. आपत्तीत त्यांचं मोल मोठं आहे.

नव्या दमाच्या या नेत्याला सामाजिक वारसा आणि दातृत्वाचे बाळकडू घरातूनच मिळाले. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा उदारपणा, दिलदारपणा या नेत्यात ठासून भरला आहे. कदम कुटुंब आणि अडचणीत सापडलेल्यांना साथ, हे समीकरण गेलं अर्धशतक सुरू आहे. सामाजिक संकटात कायम पुढं असणाऱ्या या कुटुंबाची धुरा आता आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आहे. नैसर्गिक आपत्ती आली की, आमदार साहेबांना चैन पडत नाही. याबातीत ते केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार करून थांबत नाहीत. समस्त आपत्तीग्रस्तांसाठी धावून जातात. त्यांच्या याच कामाचं कौतुक देश, विदेशात झालं आहे.

आमदार डॉ. विश्वजीत कदम हे कदम साहेबांच्या वारशाला जागत आहेत. नैसर्गिक आपत्ती प्रसंगात त्यांची खरी कसोटी कृष्णा नदीच्या महापुराप्रसंगी आली. सरकारी मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःची समांतर यंत्रणा उभी केली. महापुरात केवळ लोकांच्याच मदतीला ते धावले नाहीत तर जनावरांच्या मदतीलाही धावले. कोरोना काळातील त्यांचं योगदान कोण बरं विसरलं. पदरमोड करणारा हा नेता कोरोनाच्या महाभयंकर संकटात लोकांच्या दिलावर राज करून गेला. कोरोना महामारीनं ग्रासलेला असो वा लॉकडाऊनमध्ये फसलेली परराज्यातील लोकं, या काळात कोणतीही तमा न बाळगता आमदार डॉ. विश्वजीत कदम आपत्तीच्या मैदानात झोकून देऊन काम करत होते.

    कृषिमंत्री काकांना साकडं

सामाजिक असो वा पशुधन, याबाबतची संवेदनशीलता आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नसानसात भिनली आहे. कोरोनातून समाजव्यवस्था स्थिरावू लागलेली असतानाच, पशुधन पर्यायाने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. लम्पी साथीनं जनावरांवर मोठं संकट ओढवलं आहे. नैसर्गिक आपत्ती, त्यात शेतकऱ्यांशी निगडीत संकट आलं असताना आमदार साहेब गप्प कसं बसतील. त्यांनी तडक कृषिमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना गाठलं. कदम साहेब आणि विखे – पाटील यांचा जिव्हाळा सर्वश्रुत होता. आमदार साहेब मंत्री महोदयांना काका म्हणून संबोधतात. या नात्याच्या आग्रहाने आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी कृषिमंत्र्यांना या आपत्तीत धावून यायला सांगितलं. कृषिमंत्री काकांनीही आमदार साहेबांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!