ग्रीन पॉवर शुगर्स 7 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करेल : संग्राम देशमुख

सह्याद्री दर्पण
ग्रीन पॉवर शुगर्स, गोपूज कारखान्याची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपुज, ता.खटाव येथील कारखाना कार्यस्थळावर पार पडली. प्रारंभी स्व. संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात झाली.
संग्राम देशमुख यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना, कारखान्याच्या उभारणीसाठी शेतकरी सभासद तसेच बँकेने मदत केल्यामुळे कारखाना उभा राहिला, येणाऱ्या काळात कारखाना कर्जमुक्त करून पुढील हंगामापर्यंत शेतकऱ्यांच्या विश्वासास प्राप्त ठरणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार कारखान्यांना अडचणीच्या काळात मदत करत आहे. सरकारने १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आपलाही कारखाना १५ तारखेपर्यंत सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. शेतकऱ्यांनीही आपला ऊस गाळपासाठी पाठवून सहकार्य करण्याचे, आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण कणसे, कंपनी सेक्रेटरी बोकील साहेब, सहाय्यक अकबर शेख प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन के.एन.यादव यांनी केले. अहवालवाचन एच.वी.पाटील यांनी केले.
या वेळी जयवंत गाडगे, नंदकुमार गोडसे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत मोरे, दौलतराव देशमुख, अभिजीत सावंत, आनंदराव यादव, संजय माने, अशोक साळुंखे, माणिक मोरे, सतीश जाधव, मनोहर सकट, बाळासाहेब शिंदे, भोपाळराव देशमुख, अधिक मोहिते यांच्यासह सर्व शेतकरी, सभासद, संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.