अमरापूर सर्वसेवा सोसायटी अध्यक्षपदी मोहन पवार, उपाध्यक्षपदी जगन्नाथ कोळी यांची निवड

कडेगाव
अमरापूर (ता. कडेगाव) सर्व सेवा सोसायटी अध्यक्षपदी काँग्रेसचे मोहन पवार , उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगन्नाथ कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच शरद मोरे, कडेगाव तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, विजय रुपनर, संपत मोरे,राजेंद्र मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष मोहन पवार म्हणाले की,माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटूंबातील व्यक्तीवर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. हे माझे मोठे भाग्य आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.संस्थेची स्वतंत्र इमारत, संगणकीय कामकाज यासाठी, सभासदांना तात्काळ कर्ज पुरवठा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी फिरोज मुलाणी, संतोष रूपनर, शंकर रुपनर, सचिन रुपनर,जालिंदर देशमुख, विठ्ठल मोरे,,समीर देशमुख,सागर मोरे,अर्जुन मोरे,बाळासाहेब मोरे, जयवंत रूपनर,अमोल माने यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते. आभार सचिव सुखदेव कदम यांनी मानले.