खेराडेवांगीतील वजनदार कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

सह्याद्री दर्पण
कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने रंग भरला आहे. गावागावात राजकारणाचा फड रंगला आहे. पक्ष बदलाचा हंगाम तेजीत आहे. मागील एक महिन्यापासून यात कमालीची वाढ झाली. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेशाचा ओघ वाढता आहे.
कडेगाव तालुक्यातील राजकारणात अग्रेसर असणाऱ्या खेराडेवांगी येथील काँग्रेस विरोधी गटाचे बिन्नीचे शिलेदार काँग्रेस पक्षात दाखल झाले. यात माजी उपसरपंचाचा समावेश आहे. गावावर वर्चस्व राखणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी काँग्रेस पक्ष जवळ केल्याने याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. मागील एक महिन्यापासून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
खेराडेवांगी येथील भाजप कार्यकर्ते यांनी आ. डॉ. विश्वजीत कदम (माजी कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून तानाजी दादू सूर्यवंशी, अनिल तानाजी सूर्यवंशी (मा. उपसरपंच), विलास कृष्णा सूर्यवंशी यांनी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम (बापू) कदम यांचे हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थित डी.के.नाना, काशिनाथ सूर्यवंशी, बाळासो सूर्यवंशी, संजय कदम, लक्ष्मण सूर्यवंशी, किसन कदम, कृष्णत सूर्यवंशी, दिपक पाटील, संतोष सूर्यवंशी, श्री.संपत सूर्यवंशी, खेराडेवांगी गावातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.