आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

सह्याद्री दर्पण
राजकारणातील प्रमुख स्रोत म्हणून ग्रामपंचायतीकडं पाहिलं जातं. नेत्याच्या राजकारणाची ताकद ग्राम पातळीवरून दिसून येते. नेत्याचं राजकारण यशस्वी करण्याचं काम गाव ठिकाणाहून केलं जातं. गाव पातळीवर कार्यकर्त्यांची भक्कम तटबंदी करण्यावर नेत्याचं प्राधान्य असतं. यात आमदार डॉ. विश्वजीत कदम कुठंच कमी दिसत नाहीत. म्हणूनच त्यांचं, पर्यायानं काँग्रेसचं राजकारण झळाळून निघालं आहे. यामागं स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या वारशाचा मोठा ठेवा आहे.
ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपली बाजू भक्कम करण्यावर भर देत आहेत. यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही. नेत्यांचं भवितव्य या निवडणुकीमागं दडलं आहे. पण पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात गाव पातळीवर भक्कम करण्याची हातोटी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी साधली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा सपाटा सुरू आहे. गावोगावी हे चित्र दिसत आहे.
कुंभारगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं. ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे. त्यात काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेश आमदार साहेबांना बळ देऊन जात आहे.
पतंग जगन्नाथ कुंभार, अविनाश राजाराम कांबळे, पोपट तानाजी कांबळे, शरद विठ्ठल चव्हाण, शिवाजी किसन चव्हाण, विकास पतंग चव्हाण, सागर विजय चव्हाण, गोरख श्रीपती कांबळे, राजेंद्र जगन्नाथ चव्हाण, विकास एकनाथ चव्हाण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विश्वजित कदम व सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम यांचेहस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सरपंच भगवान नालगे, हणमंत लाड, शिवाजी लाड, उमेश जमदाडे, हिम्मत लाड, सुनील जमदाडे, राजेश चव्हाण, चैतन्य नालगे, हिम्मत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.