ताज्या घडामोडी

कडेगावात नाभिक समाजाचा मेळावा

सह्याद्री दर्पण
कडेगाव येथील गणपती मंदिरात तालुका नाभिक संघटनेचा पदाधिकारी निवड मेळावा राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्या उपस्थितीत व जयवंतराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

या वेळी तालुका अध्यक्ष म्हणून रवींद्र रमेश पवार तर उपाध्यक्ष म्हणून दीपक सदाशिव शिर्के व दत्तात्रय उर्फ सागर शिवाजी शिर्के (उपाध्यक्ष ), प्रशांत बाळासाहेब क्षीरसागर, (सचिव ),नवनाथ रामचंद्र शिंदे (कार्याध्यक्ष ), युवाध्यक्ष अमर पवार यांची तर तालुका पूर्वाध्यक्ष संभाजी मोहन जाधव यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

देशात ओबीसीना न्याय देण्यासाठी नाभिक समाजाचे कर्पुरी ठाकूर व राज्यात हणमंतराव साळुंखे तात्या यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा विचार घेऊन आपण सर्व जण वाटचाल करूया असे प्रतिपादन सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केले. जिल्हातील नाभिक समाज सक्षम उभा राहावा म्हणून संघर्ष करणार जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी मत व्यक्त केले.

प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे यांनी केले. यावेळी संभाजी जाधव, आर. के. रोकडे, नंदू सपकाळ यांची भाषणे झाली.जगन्नाथ क्षीरसागर, सतीश शिर्के, विकास शिर्के,महेश सपकाळ, शिवाजी यादव, अनिल पवार, संतोष काशीद, शंकर शिंदे, सुरज शिंदे योगेश झेंडे, हणमंत गवळी, रमेश गायकवाड आदी तालुक्यातील प्रत्येक गावचा प्रतिनिधी उपस्थित होता.
सूत्रसंचालन व आभार नितीन पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.