पलूस-कडेगाव मतदारसंघ आमचं कुटुंब : स्वप्नालीताई कदम
दुधोंडी
दुधोंडी तालुका पलूस येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी स्वप्नालीताई कदम बोलत होत्या.
या कार्यक्रमास भारतीताई लाड, डॉ मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, निर्मलाताई जाधव ,सरपंच उषा देशमुख, अस्मिता जाधव, सुनंदा जाधव, प्रणाली पाटील,उज्वला नलवडे आदी महिलांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी स्वप्नालीताई कदम म्हणाल्या, मोठ्या साहेबांनी या मतदार संघात मोठे काम केले आहे. साहेबांनी कठीण प्रसंगातून आपला प्रवास चालू करून त्यांनी पलूस – कडेगाव मतदार संघाचे नंदनवन केले.पलूस – कडेगाव मतदार संघ आमचे कुटुंब आहे. या मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, साहेबांनी अनेक संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला. आरोग्य सेवा आपल्या भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या चालू आहे. बाळासाहेब अनेक परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत आहेत. बाळासाहेबांनी सहा वर्षात अनेक कोटींचा निधी सरकार नसताना खेचून आणला. जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल साठी प्रयत्न केले आहेत. साहेबांच्या माध्यमातून नुसते काम बोलत आहे. शेतकऱ्यांसाठी कृष्णा कॅनॉल बारमाही करण्यासाठी मोठे काम आहे. पंचसूत्री जाहीर केलेला कार्यक्रम महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे राबवणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या प्रकारे योजना राबवल्या जाणार आहेत. शिक्षण, आरोग्य, क्रीडा यावर नेहमी बाळासाहेब काम करीत असतात. तुम्ही मतदार मताच्या रूपात आमच्यावर प्रेम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मयुरी जाधव यांनी केले व आभार सुनंदा जाधव यांनी मानले. महिला मेळावा झाल्यानंतर दुधोंडी गावातून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या. पदयात्रा सुरू असताना घरोघरी त्यांचे हळदीकुंकू लावून औक्षण होत होते.