ताज्या घडामोडी

निवडणुकीत अमिषाला बळी पडू नका : संग्राम देशमुख

कडेपूर
निवडणुकीत अमिषाला बळी पडू नका, भाजपा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या खात्यात किती रक्कम जमा होते याचा हिशोब विरोधकांना सांगा. आणि मला सेवेची संधी द्या, असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले.

सोहोली, चिखली; अमरापूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. तरूणांनी हिरीरीने सहभाग घेत गावातून पदयात्रा काढल्या. लाडक्या बहिणींनी औक्षण केले.

संग्राम देशमुख म्हणाले, आतापर्यंत ज्यांनी तुमची कामे केली नाहीत, ते तुमच्या समोर तोंड दाखवायच्या योग्यतेचे नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते वाट्टेल ते प्रयोग करतील. भावनिक बोलतील आणि चिरीमिरी घेऊन तुमच्या दारात येतील. परंतु तुम्ही त्या लक्ष्मीपुत्रांना भाजपा महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचा हिशोब सांगा. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता दर महिन्याला एकविसशे रूपये मिळणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेचे राज्याचे आणि केंद्राचे मिळून १२ हजार रुपये येत आहेत. असा सगळा हिशोब काढला तर सरकार कुटुंबाला किती हातभार लावते याचा अंदाज येतो. परंतू कॉंग्रेसचे लोक या सर्व योजना बंद करण्याची भाषा बोलत होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी महायुतीचे सरकार आणा त्यासाठी मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.

सोहोली येथे संदीप मोहिते, हर्षल नलवडे, संभाजी मोहिते, गोरख मोहिते, शशिकांत मोहिते, सदाशिव मोहिते, शंकर मोहिते, माजी उपसरपंच सुरेश मोहिते, माजी सरपंच संतोष यादव आदी उपस्थित होते.
चिखली येथे राहुल शिंदे, शंकर जाधव, जयवंत शिंदे, विजय जाधव, राजेंद्र शिंदे, शशिकांत जाधव, गणाबा शिंदे उपस्थित होते.
अरापूर येथे अमरदीप मोरे , दशरथ मोरे, राकेश मोरे, आनंदराव मोरे, विनोद मोरे, सरपंच प्रकाश गडळे, प्रशांत पाटील, जीवन पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.