ताज्या घडामोडी

स्वप्नालीताईंचा आजींसोबतचा फोटो होतोय तुफान व्हायरल…!

दत्ता पवार
लहानग्यांशी प्रेमानं आणि थोरांशी अनुकंपेनं वागावं, ही शिकवण आपली संस्कृती देते. असं असलं तरी बदलत्या काळात संस्कार, संस्कृती मागं पडत चाललीया. पण आदर्शाचा मापदंड ठरवून देणारी संस्कृती अजूनही जित्ती आहे, हे अधूनमधून दिसून येतं. असंच उदाहरण ठळकपणानं दिसून आलं. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्नुषा सौ. स्वप्नालीताई विश्वजीत कदम वयोवृद्ध महिलेची आस्थेनं विचारपूस करताना दिसून आल्या. हा क्षण निष्णात फोटोग्राफरनं कॅमेऱ्यात बंदिस्त केला. त्याला काय ठावं, आपला फोटो एवढा व्हायरल होईल. सौ. स्वप्नालीताईंचा वयोवृद्ध आजींसोबतचा फोटो तुफान व्हायरल होतोय.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर भलताच गरम झाला आहे. गावोगावी प्रचाराचं मैदान गाजू लागलं आहे. लहानांपासून थोरांपर्यंत निवडणुकीच्या बाता ठोकत आहेत. मतदान जवळ येऊ लागलं आहे. उमेदवारांची शर्थीची धावाधाव सुरू आहे. महिलांना निवडणुकीत आणि प्रचारात कमालीचं महत्व आलं आहे.

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांना साथ देण्यासाठी सौभाग्यवती प्रचारात उतरल्या आहेत. सौ. स्वप्नालीताईंचा प्रचार दौरा मतदारसंघात खूपच चर्चेचा ठरलाय. स्वप्नालीताईंचे पती आमदार डॉ. विश्वजीत कदम, सासरे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. पती आणि सासऱ्यांचं सामाजिक आणि राजकारणातील मोठं नाव, कर्तबगारी, यामुळं स्वप्नालीताईंवर प्रचाराचा दबाव होता. असं असताना प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी निश्चितच कौतुकास्पद आहे.

स्वप्नालीताईंचा प्रचार पलूस तालुक्यात प्रभावी ठरलाय. पती व सासऱ्यांनी मतदारसंघासाठी दिलेलं योगदान त्या महिलांना पटवून देत आहेत. काँग्रेस पक्षाचा पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे मांडताना दिसतायत. सभा, बैठकांवर त्यांचा भर आहे. प्रचार फेरीत मतदारांना आवाहन करत आहेत. असंच आवाहन करताना एक बुजुर्ग महिला प्रचारफेरी आपल्या अंगणात पाहत बसली होती. हे सौ. स्वप्नालीताईंच्या निदर्शनास आले. त्या थेट वृद्ध आजीकडं गेल्या, विचारपूस केली. दोघींनी हस्तांदोलन केलं. हे चाणाक्ष फोटोग्राफरनं पाहिलं. आणि तो क्षण कॅमेराबद्ध झाला. कॅमेऱ्यात कैद झालेला स्वप्नालीताई व आजींचा फोटो बाहेर येताच व्हायरल झाला. हा फोटो तुफान व्हायरल झाला. या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.