भाजपची विचारसरणी पुढे घेऊन जाण्याची कुवत संग्राम देशमुखांच्यात : मा. आ. पृथ्वीराज बाबा देशमुख
संग्राम देशमुख यांना मतदार विक्रमी मतांनी निवडून देतील : पृथ्वीराज बाबा
कडेपूर
पलूस – कडेगाव मतदार संघाचा झालेला विकास पाहता मतदार संघात येणाऱ्या काळात महायुती व भारतीय जनता पक्षाचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मतदार उच्चांकी मतांनी निवडून देतील, असा विश्वास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला.
नेवरी ता. कडेगाव येथे महायुती भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ नेवरी पंचायत समिती गणातील गावागावातील कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
नेवरी येथील बैठकीत पृथ्वीराज देशमुख म्हणाले, हा मतदारसंघ माजी आमदार संपतराव देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. यामुळे संपतराव देशमुख यांनी विकसित मतदार संघाचे पाहिलेले स्वप्न साकार होणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, नमो शेतकरी योजना, प्रधानमंत्री किसान योजना, अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही महायुती सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे. येणारा काळ भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.
यावेळी युवा नेते सुशांत महाडिक, संतोष महाडिक, वसंत महाडिक, विठ्ठल महाडिक, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.