आमदार साहेबांचं गावोगावी असं होतंय स्वागत !
दत्ता पवार
कर्तृत्व असं असावं की, कर्तृत्वाला सलाम ठोकावा. माणसाला कर्तृत्वच दिशा दाखवत, दिशा ठरवतं. वास्तवातल्या दुनियेत कर्तृत्ववानाला डोक्यावर घेतलं जातं. याचा प्रत्यय पदोपदी आलेल्या व्यक्तिमत्वाविषयी उहापोह करणार आहोत. कर्तृत्ववान व्यक्तीचं नाव डॉ. विश्वजीत कदम असं आहे. त्यांच्या नावातच विश्व सामावलं आहे. त्यांचं कार्यही तसंच साजेसं आहे. भलं त्यांना वडिलांचा टोलेजंग वारसा मिळाला असंल. म्हणून त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व कमी होत नाही. त्यांच्या कार्यकुशलतेमुळं गावोगावची लोकं त्यांचं जल्लोषात स्वागत करत आहेत. या जल्लोषात मिरवणुकीचा थाट पाहायला मिळतो. लोकांच्या प्रेमानं आमदार डॉ. विश्वजीत कदम सद्गतीत होतात, भारावून जातात.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांना लोकांनी मोठी माया लावली, प्रेम दिलं. तेच प्रेम, माया लोकं आता डॉ. विश्वजीत कदम यांना देत आहेत. हा उहापोह करण्याचं कारण ठरलीया विधानसभा निवडणूक. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यापासून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आलाय. या चर्चेमागं खास कारण आहे. या मतदारसंघातून डॉ. विश्वजीत कदम रिंगणात आहेत. खास करून लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची क्रेझ भलतीच वाढलीया. त्यांचं नाव देशपातळीवर गाजत आहे. देश पातळीवर गाजणाऱ्या आपल्या नेत्याबद्दल त्यांच्या पाठीराख्यांना खूप कौतुक आणि कुतूहल आहे. यामुळं आमदार साहेब आपल्या गावात येताच त्यांची जल्लोषात मिरवणूक काढली जाते, मोठ्या मताधिक्यांचं वचन दिलं जातं.