पलूस तालुक्यातील वकील संघटनेला संग्राम देशमुखांचं पाठींब्याचं आवाहन
पलूस
पलूस- कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी पलूस तालुक्यातील वकिलांनी भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले. प्रचार दौऱ्या दरम्यान पलूस तालुका बार असोसिएशनला संग्राम देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
संग्राम देशमुख म्हणाले, वकील हा घटक समाजातील महत्वाचा घटक आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करता. न्याय व्यवस्था आहे म्हणून समाजात नीतिमूल्य जपली जातात. माझे वडील वकील होते याचा मला अभिमान आहे. त्यांनी नेहमीच न्यायाची बाजू घेतली होती. भागाचा विकास आणि सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. देशात आणि राज्यात पारदर्शकपणे काम करणाऱ्या महायुतीचे सरकार पुन्हा येण्यासाठी साथ द्यावी. असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले. यावेळी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.