ग्रीन पॉवर शुगर्स; ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचा वाली बनलाय !
![](https://sahyadridarpan.in/wp-content/uploads/2024/11/IMG_20241129_191620-780x470.jpg)
सह्याद्री दर्पण
हल्ली आरोग्यावर बरंच बोललं जातं. काही अंशी कृतीही केली जाते. पण समाजातील शेवटच्या घटकातील लोकांची आरोग्य सेवा कुठं घडतेय. सामाजिक संस्था वगळ्यास, शासन पातळीवर खूपच उदासीनता जाणवते. गरीब मजुरांनाही वाटतंय आमचंही कोणी वाली बनावं. ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचा वाली बनण्याचं काम गोपूज ता. खटाव येथील ग्रीन पॉवर शुगर्सनं केलं आहे.
ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज साखर कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार ऊसतोडणी कामगार, वाहतुकदारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी (औंध) येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ऊसतोडणी मजूर, स्त्रिया, गरोदर स्त्रिया, लहान बालके, ड्रायव्हर व कामगारांची आरोग्य तपासणी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. ऊस गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये ऊसतोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधीमध्ये तीन टप्प्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची महिती यावेळी कारखाना प्रशासनाने दिली.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत जाधव, जनरल मॅनेजर(केन) मनोहर मिसाळ, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, लेबर ऑफिसर विनोद यादव, ऊसविकास अधिकारी अमोल साठे, हेड टाईम कीपर संतोष जाधव, सुरक्षा अधिकारी धनाजी आमले, प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे आरोग्य अधिकारी डॉ. संकेत मोरे, आरोग्य सहाय्यक डॉ.घाडगे, आरोग्य सेविका, सेवक, आशावर्कर, मदतनीस यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.