क्राईमग्रामीण वार्ताताज्या घडामोडीसंपादकीय
बाबा आढाव यांच्या आंदोलनाला आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा पाठिंबा
सह्याद्री दर्पण
लोकशाहीच्या संरक्षणार्थ डॉ. बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन पुण्यात सुरू आहे. आंदोलनस्थळी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट दिली व पाठिंबा दिला.
विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीने त्सुनामी विजय संपादन केला. महायुतीचा हा विजय महाराष्ट्राच्या सजग मनाला पटेनासा झाला. उभा महाराष्ट्र अचंबित झाला. विरोध, निषेध, आंदोलने सुरू आहेत. याची धग दिवसागणिक वाढत आहे.
डॉ. बाबा आढाव यांनी या विरोधात राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पाठिंबा दिला.