क्राईमग्रामीण वार्ताताज्या घडामोडीसंपादकीय
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केलं अभिवादन

सह्याद्री दर्पण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी अंकलखोप येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मारकास अभिवादन केले. यावेळी अंकलखोप येथील नागरिक उपस्थित होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अस्पृश्यता निवारणाचं काम केले नाही. तर त्यांनी देशाच्या जडघडणीत मोठं योगदान दिलं. आपल्या देशात त्यात महाराष्ट्राचे असणं हीच मोठी गोष्ट आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा मूलमंत्र दिशादर्शक आहे. संविधान निर्माते म्हणून त्यांचे देशावर अनंत उपकार आहेत. त्यांनी दिलेली शिकवण अंगिकारून वाटचाल केली पाहिजे. त्यांचे विचार, आचार शेवटच्या घटकापर्यंत दिशा देणारे आहेत.